दि. ३० ऑगस्टला बाळराजांनी एक सूचक tweet केले होते कि पुढील
काही आठवड्यात फ्रांसमध्ये काही मोठे होणार आहे. त्यानंतर दि. २१ सप्टेंबर रोजी le
monde या दैनिकाच्या दिल्लीस्थित पत्रकाराने एक tweet केले.
“फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्सुआ ओलांद भारत सरकारशी
असहमत आहेत. त्यांच्यामते अनिल अंबानी (रिलायंस डिफेन्स)ची निवड Dassault ने केली
नाही. “आम्हाला पर्याय नव्हता. आम्ही देण्यात आलेला भागीदार घेतला.” #Rafale.”
आणि चर्चा सुरु झाली.
प्रश्नांचा भडीमार झाल्यानंतर या पत्रकाराने mediapart.fr या
वेब प्रकाशनावरील ओलांदच्या तथाकथित मुलाखतीतील (फ्रेंच भाषेतील) निवडक वेचे
twitter वर टाकले. या वेच्यांचे भाषांतर गुगलवर करु नये असा त्याने आग्रह केला.
असो. त्या चार वेच्यात ओलांद काय म्हणाले ते अजून अंतरजालावर उपलब्ध नाही. पण
त्यांच्या तोंडचे तथाकथित वाक्य प्रमाण मानून इंग्रजी वृत्तपत्रांनी एकच राळ उडवून
दिली. त्या विधानाचे खरेखोटे करण्याचे औचित्य कोणी पाळले नाही. इथे हे सांगणे
महत्वाचे आहे कि ओलांद हे आपल्या कुप्रसिध्दिमुळे मागील निवडणुकीत भाग घेऊ शकले
नाहीत. त्यांची राजकीय अस्तित्वासाठी लढाई सुरु आहे. अशा माणसाच्या शब्दावर कितपत विश्वास
ठेवावा हाच मुळात प्रश्न असताना या बातमीला इंग्रजी वृत्तपत्रांनी इतके महत्त्व का
दिले हा विचार करायचा मुद्दा आहे.
फ्रान्स सरकारच्या किंवा Dassault च्या अधिकृत खुलाश्याची कुणी
दखलच घेतली नाही. दि. २१ रोजी म्हणजे ओलांदचे विधान प्रकाशित झाले त्याच दिवशी Dassault
ने खुलासा करून सांगितले कि रिलायन्सशी भागीदारी करावी हा त्यांचा निर्णय होता. त्या
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रापीए यांनी MINT या वृत्तपत्राला एप्रिल
२१०८ मध्ये दिलेल्या मुलाखतीत तसे स्पष्ट केले होते. महिंद्रा, कायनेटिक आणि इतर
शंभरएक कंपन्यांबरोबर करार करण्याचे काम चालू आहे असेही या खुलाश्यात नमूद आहे.
म्हणजे रिलायंसशी व्यवहार करण्याची सक्ती Dassault ला करण्यात आली नाही.
संपुआ काळात झालेला करार व्यवहार्य नव्हता म्हणून दुसरा करार
केला, त्यात मर्जीने Dassault ने रिलायन्सला भागीदार केले. आता काय उरले? तर “मोदीजीने
अंबानीके जेबमे ४१ हजार करोड रुपये डाले” हे घोषवाक्य.
लढाऊ विमान खरेदीचे आकडे आहेत तर मोठेच असणार. पण मुद्दा किती
करोडचा गैरव्यवहार हा नाही. तर गैरव्यवहार काय झाला हा आहे. झालाच नाही तर काय
करावे? हा भाजपाचा बोफोर्स घोटाळा आहे असा बभ्रा. पण बोफोर्स मध्ये दलालीचा विषय
होता. इथे तसं काही नाही. मग आणखी एक काढा. वरच्या चित्रात दिसतात त्या बाई म्हणजे
ज्युली गाये, ओलांदची लिव इन पार्टनर जी एक अभिनेत्री आणि सिनेनिर्माती आहे.
त्यांच्या सिनेमाला रिलायंसच्या एका
संस्थेने अर्थसाहाय्य केले आणि नंतरच राफालबाबत करार झाला अशी एक टूम काढली.
आता हा दावा इतका पोकळ आहे कि ज्याचे नाव ते. एक तर त्या बाई
गेले अनेक वर्षे सिनेव्यवसायात आहेत. २००९ पासून चित्रपटनिर्मिती करतात. रिलायंस
इंटरटेन्मेंट नावाची एक मोठी कंपनी २००५ पासून या क्षेत्रात आहे. त्यांनी आपापसात
एक करार केला यात काय वावगे आहे? आणि जर काही वावगे असेल तर ते म्हणजे एका राजकीय नेत्याच्या
नात्यातील व्यक्तीचा एखाद्या करारात फायदा झाला. तो पैसा गेला रिलायन्सच्या
तिजोरीतून. याचा मोदींशी काय संबंध?
शेवटचा मुद्दा आकड्यांचा. ४१,००० कोटी रुपयाचा आकडा कुठून आला?
आणि मग बाळराजेंचे हे tweet. एकदम १३३ हजार कोटी रुपयांवर उडी?
राहुल गांधी हल्ली मोदींना चोर म्हणताहेत. देशाच्या पंतप्रधानांबाबत
असे बोलणे हा त्यांचा स्वभाव नसेल असे वाटते. म्हणून राफाल पुराणाचा खरा मुद्दा असा, कि
बाळाला पोपटपंची कोण पढवतंय?
(संपूर्ण)
श्रीरंग चौधरी
(संपूर्ण)
श्रीरंग चौधरी
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete