‘अधिसभेने निवाड्याविषयी विचार करावा’, राजा त्यादिवशी
विसाव्या वेळी म्हणाला.
‘नाही, नाही!’ राणी म्हणाली. ‘शिक्षा आधी – निवाडा नंतर.’
‘काहीतरीच आपले!’ अॅलिस उद्गारली. ‘शिक्षा कुठे निवाड्याआधी
असते का?’
‘जीभ आवर तुझी!’ तिरीमिरीत राणी म्हणाली.
‘मी बोलणार!’ अॅलिस म्हणाली.
‘शिरच्छेद करा तिचा!’ राणी मोठ्याने ओरडली. सभा स्तब्ध झाली.
Alice’s
Adventures in Wonderland
अवजड शासनयंत्रणा पायल तडवीच्या मृत्युनंतर तत्परतेने
हलली. वेगवेगळ्या संस्थांना अचानक जाग आली. सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पायलचा
लढा अंगिकारला. घोषणा झाल्या, फलकबाजी झाली. मेणबत्त्या लावून मोर्चे काढून झाले.
आरोपींविषयी कुणालाच आस्था नव्हती. त्यांनी त्यांच्या
संघटनेला [MARD] उद्वेगाच्या
भावनेने एक पत्र लिहिले, “जर जास्त कामाच्या ताणाला रॅगिंग म्हणून नाव दिले तर
आम्ही आमच्या रोजच्या कामात सुद्धा कुणाला न कुणाला रॅगिंग करतच आलोय . . . .”
आरोपींचे हे पत्र त्यांची अगतिकता दाखवते, पण पायलला कामाचा ताण होता
हेही सांगते. मयत पायलकडून त्या वेळपर्यंत काहीच नमूद नव्हते. पायलने
आत्महत्येपूर्वी कुठली चिट्ठी लिहिली होती का याच्या चौकशीसाठी आरोपितांना कोठडीत
ठेवण्यात आले. त्यानंतर प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेकडे करण्यात आली.
आरोपी
डॉक्टरविरुध्दचा अतिशय गंभीर शिक्षा असलेल्या गुन्ह्यांची फिर्याद गडबडीने
नोंदविण्यात आली.
[MARD] ला लिहिलेल्या
पत्रात आरोपी आर्जव करतात, “पायलच्या आत्महत्येचे कारण आम्हाला माहिती नाही म्हणून
विनाकारण आमहाला दोष देऊन अॅट्रॉसिटीचा आरोप आमच्यावर लावणे हा खूप मोठा अन्याय
आहे.” वैद्यकीय जगत, पोलीस आणि एकंदरीत समाज या आत्महत्येचे कारण समजून घेण्यास
असमर्थ आहेत.
मात्र या पत्रानंतर परिस्थिती बदलली. आरोपींवर पायलला
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लागला. दरम्यान, Maharashtra
University of Health Sciences [MUHS] ने एक तथ्यशोध समिती स्थापन केली.
इंडियन मेडिकल असोसिएशन [इमा] ने सुध्दा एक समिती स्थापन केली. या समितीच्या
अहवालाच्या आधारावर आरोपींचे संघटनेकडून निष्कासन करण्यात येऊ शकते.
असे झाल्यास त्यांना पुढे पाच वर्षे
कुठल्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार नाही. नायर हॉस्पिटलच्या रॅगिंगप्रतिबंधक
समितीने आपला अहवाल सादर केला. याशिवाय राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोगाने
याबाबतीत चौकशीसाठी नेमलेल्या समितीने हे प्रकरण हत्येचे आहे का असा प्रश्न
उपस्थित केला.
आता
ही बाब अलाहिदा कि या सर्व चौकश्या मुख्य पात्रांच्या अनुपस्थितीत झाल्या. कारण
पायल तर बोलूच शकत नाही आणि आरोपी डॉक्टर कोठडीत. त्यांचे पालक काय बोलणार,
त्यांना कितपत माहिती असणार? आणि मग नैसर्गिक न्यायाचा पहिला नियम कि सर्वांचे
ऐकून निर्णय घ्यावा त्याचे काय? आणि या सर्व चौकशा इतक्या घाई गडबडीत
कशासाठी?
या
सर्व समित्यांचे निष्कर्ष कदाचित तथ्यहीन होतील अशा वेगवेगळ्या पण एकमेकांशी निगडीत
अशा तीन मोठ्या मुद्द्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झाले. यांचा विचार योग्य रीतीने
केल्यास आरोपींवरचे मळभ दूर होतील आणि वेगळेच चित्र समोर येईल अशी परिस्थिती आहे.
एक
म्हणजे या घटनाक्रमात पायलचा विचार एक विवाहिता म्हणून झालाच नाही.तिच्या
पतीशी तिचे संबंध कसे होते याविषयी कुणी काही बोलत नाही. पायलच्या भावाने सांगितले
कि ती तिच्या माहेरच्या आर्थिक स्थैर्यासाठी शिक्षण घेत होती. तिचे आई वडील लवकरच निवृत्त
होणार होते. प्रश्न असा, कि एक विवाहित स्त्री असा विचार का करेल? या टोकाच्या
विरुध्द अशीही एक बातमी होती कि पायल तिच्या कामाला आणि त्यातून उद्भवणाऱ्या
त्रासाला इतकी कंटाळली होती कि ती आपले शिक्षण सोडून द्यायच्या तयारीत होती. एकदा
प्रवेश घेतलेला वैद्यकीय अभ्यासक्रम मधूनच सोडल्यास दंड लागतो. त्यासाठी भरावी
लागणारी रक्कम म्हणून पायलने आपल्या माहेरच्या लोकांना रु. २० लाख तयार ठेवण्यास
सांगितले होते. यातून असा प्रश्न कि इतकी रक्कम बाजूला बाळगून असलेल्या
कुटुंबासाठी लग्न झालेल्या मुलीने कमावून द्यायची काय गरज आहे?
दुसरा
मुद्दा असा कि पायल आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त होण्याइतकी अगतिक झाली होती हे
गृहीत धरले तरी त्यासाठी इतर कारणे असण्याची शक्यता ठामपणे नाकारता येत नाही.
विवाहसंबंधातील ताणतणाव, उज्ज्वल भविष्य दर्शविणारे शिक्षण पण ते पूर्ण करण्याची
खरी अथवा आभासी असमर्थता, बेशिस्त वागण्यामुळे कामाचा कंटाळा आणि त्यातून निर्माण
होणाऱ्या समस्या. या व अशा कैक कारणांनी पायलच्या मनात आत्महत्येच्या वेळी
विचारांचे काहूर माजवले असेल. एकच कारण असेल, नाही आहेच हे गृहीत धरून आरोपींना
लक्ष्य करणे संयुक्तिक नाही.
तिसरा
आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपींना या प्रकरणात तथाकथित गुन्हा
करण्यामागे कुठलाही उघड दिसणारा असा हेतू नाही. परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित
प्रकरणांमध्ये आरोपींचा हेतू सर्वतोपरी महत्वाचा असतो. सबळ हेतू दोषाचा पुरावा
म्हणून ग्राह्य धरल्या जातो. हेतूचा अभाव आरोपितांना दोषमुक्त करू शकतो. दोष सिद्ध
होईपर्यंत आरोपींना निर्दोष गृहीत धरले पाहिजे असा कायदा आहे.
मात्र
पायल तडवी प्रकरणात पोलिसांचा तपास आणि इतर समित्यांनी केलेली चौकशी यात काही बाबी
गृहीत धरल्या गेल्या आहेत. पायलने लिहिलेल्या तथाकथित suicide note चे एक छायाचित्र पोलीस तपासात पायलच्या फोनमध्ये सापडली अशी
बातमी होती. पायलला जातीवर आधारित छळ होता आणि त्याला कंटाळूनच तिने आत्महत्त्या
केली, तिला आत्महत्त्या करण्याचे दुसरे काही कारण नव्हते असे चित्र बातम्यात आणि
लेखात होते. पण पायलने तिच्या आईला जातीचा उल्लेख करू नये असे सांगितले होते या बातमीशी
हे चित्र विपर्यस्त आहे. पायलने
स्वत: उल्लेख केला होता कि तिच्या सिनियर
रेसिडेंटला तिची जात माहिती नाही.
पायलच्या आत्महत्त्येनंतर आलेल्या वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांमधील
बातम्यांमध्ये पायलच्या शेवटच्या दिवशीच्या हालचालींविषयी काहीच नाही. तिच्या फोनवरून
शेवटचे कॉल कुणाला होते? whatsapp, sms संदेश कुणाला होते? हे बोलणे किंवा संदेश कशाविषयी होते?
पायलच्या मृत्युनंतर तिला या न त्या गोष्टीचे प्रतिक
बनवण्याचे राजकारण झाले. हे राजकीय किंवा सामजिक संघटनांनी करणे स्वाभाविक आहे. पण
आरोपींविरुध्द इतक्या पद्धतशीर योजनेने जनमत तयार करणे, त्यासाठी वेळोवेळी निवडक
बातम्या प्रसारित होणे हे थोडे अनाकलनीय आहे. कुठेतरी काहीतरी चुकतंय.
प्रश्न असा कि पायलच्या मृत्यूमुळे आरोपींना काय फायदा
झाला?
महत्वाचा प्रश्न हा कि आरोपींकडे बोट दाखवून कुणाचा
फायदा होतोय?
आणि पायल तडवीच्या मृत्युला समजून घेण्यासाठी कळीचा
मुद्दा असा, कि या प्रकरणात हेमा अहुजा,
अंकिता खंडेलवाल आणि भक्ती मेहरे
खलनायिका आहेत – का कुणाला वाचवण्यासाठी त्यांचा बळी दिला जातोय?
अश्वम नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च
अज:पुत्रं बली दद्यात देवो दुर्बलघातक:
अज:पुत्रं बली दद्यात देवो दुर्बलघातक:
भावार्थ: घोडा नाही, हत्ती नाही, वाघ तर नाहीच नाही,
शेळीच्या कोकराचाच बळी देतात
शेळीच्या कोकराचाच बळी देतात
(कारण) देवसुद्धा दुर्बलांचा घात करतात
© श्रीरंग चौधरी
© Shrirang
Choudhary
Image courtesy: mumbaimirror.indiatimes.com
This article is adapted with edition from the original article in English
http://bit.ly/STC4evY
This article is adapted with edition from the original article in English
http://bit.ly/STC4evY
Very true
ReplyDeleteVery true m strongly support ur view
ReplyDeleteIt is a totally a falls case...and I am in shock how media not doing their job properly
Media dose not do what is wrong and what is right
This is media lynching and dirty vote politics at its lowest and most disgusting form. It has made all the unreserved category distressed and anxious.
ReplyDelete